ग्यानकूल सोबत तीन महिन्यांचा एक अनोखा प्रवास
आधुनिकतेच्या युगात आपली भारतीय संस्कृती हरवत चालली आहे. पण खरी आधुनिकता ही आपल्या आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक वारशाचा सखोल अभ्यास करून त्याचे जतन करण्यात आहे. या दृष्टीकोनातून, तरुण पिढीत भारतीय संस्कार रुजवण्यासाठी आम्ही एक प्रेरणादायी अभ्यासक्रम तुमच्यासमोर आणत आहोत.
७ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी
मर्यादित कालावधीसाठी ऑफर ₹५,९९९/- ₹१,४९९/-
(10 मे पर्यंत)
नोंद: जर तुम्ही कधी लाईव्ह सत्रात सामील होऊ शकला नाहीत तर काळजी करू नका. तुम्हाला १०८०P मधल्या लाईव्ह सत्रांच्या रेकॉर्डिंग्सचा पुढील ३० दिवसांकरिता मोफत अॅक्सेस मिळेल!
सुरु होतेय
दिनांक 10 मे २०२५
वीकेंड बॅच
शनिवार आणि रविवार
लाईव्ह सत्राची वेळ
संध्याकाळी ४.३० - ५.३०
गैरहजर असल्यास
रेकॉर्डेड सत्र पाहू शकणार
कोर्स बद्दल माहिती
कालावधी: ३ महिने (२४ लाईव्ह सत्रे)
भाषा: मातृभाषेबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी पूर्णपणे मराठीत.
मर्यादित कालावधीसाठी ऑफर ₹५,९९९/- ₹१,४९९/-
-
❖ शिवचरित्र - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कौशल्यांचा एक अथांग सागर (कोर्सचे प्रमुख आकर्षण)
- महाराष्ट्रावर झालेले पहिले आक्रमण
- महाराजांचा जन्म
- त्यांनी जिंकलेल्या अनेक गड किल्ले यांच्या शौर्यगाथा
- गड किल्ल्यांची ऑनलाईन गडफेरी
- महाराजांच्या अनेक मावळ्यांची ओळख आणि त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले योगदान यांच्या कथा
- महाराजांची जीवनकौशल्ये - वेळेचे नियोजन, आर्थिक नियोजन, व्यवहार ज्ञान, दूरदृष्टी आणि बरच काही
-
❖ विविध स्तोत्र मंत्र
- ओंकार, त्याचा अचूक उच्चार आणि अर्थ
- गायत्री मंत्र, त्याचा अचूक उच्चार आणि अर्थ
- गणपती स्तोत्र, त्याचा अचूक उच्चार आणि प्रत्येक श्लोकाचा अर्थ
-
❖ ग्यानकूल मार्फत एक ई-बूक
- "शौर्यगाथा" विद्यार्थ्यांसाठी विशेष ई-बुक! छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, धैर्य आणि कणखर नेतृत्वाच्या प्रेरणादायी कथा या पुस्तकात समाविष्ट आहेत.
- इतिहासातील महत्त्वाचे प्रसंग सोप्या आणि रोचक शैलीत मांडलेले आहेत, जे मुलांना राष्ट्राभिमान आणि नेतृत्वगुणांची प्रेरणा देतील
-
❖ लहान वयातच आध्यात्मिक विकास
- दररोजच्या प्रार्थनेचे महत्त्व जाणून घेऊन, मुलांच्या विचारांना, एकाग्रतेला आणि आत्मबळाला प्रेरणा मिळणार.
- स्तोत्र मंत्रांच्या साहाय्याने, शाळेतील जीवन, मैत्री आणि विविध आव्हानांना शांत आणि आत्मविश्वासाने सामोरे जाता येणार.
- छोट्या छोट्या आध्यात्मिक सवयींसोबत मुलांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवून आणता येणार.
-
❖ सत्रांचे रेकॉर्डिंग्स ३० दिवसांसाठी उपलब्ध
- तुम्ही लाईव्ह सत्रांना हजर राहू शकत नसल्यास काळजी करू नका.
- आम्ही तुम्हाला संपूर्ण सुविधा देत आहोत. कार्यशाळा संपल्यानंतरही ३० दिवसांपर्यंत थेट सत्रांचे रेकॉर्डेड व्हिडिओज् तुमच्याकडे उपलब्ध राहतील. ज्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते पाहू शकता.
शौर्यगाथा द्वारे येणारे परिवर्तन
शौर्यगाथा हा केवळ इतिहास शिकवणारा अभ्यासक्रम नाही, तर तो तरुण मनांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, नीतिमत्ता आणि स्वराज्याच्या मूल्यांची प्रेरणा देणारा एक प्रवास आहे. या माध्यमातून मुलांना त्यांच्या पराक्रमाच्या कथा समजतील आणि त्यांच्यात आत्मविश्वास, धैर्य आणि कर्तव्यभावना निर्माण होईल. तसेच, मूलभूत स्तोत्रे व मंत्रांच्या अभ्यासाने त्यांना मानसिक शांती, एकाग्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळेल.
२४ दिवसात काय शिकवले जाणार ?
शौर्यगाथा हा ग्यानकूल ने तयार केलेला ३ महिन्यांचा असा अभ्यासक्रम आहे, ज्यात येणाऱ्या पिढीमध्ये भारतीय संस्कार आणि मराठी मातीविषयी प्रेम निर्माण केले जाणार आहे. या २४ प्रभावी सत्रांमध्ये सहभागी विद्यार्थी भारताच्या आणि महाराष्ट्राच्या समृद्ध अश्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक गोष्टींचा सखोल अभ्यास करतील. प्रत्येक सत्र हे महाराजांच्या जीवनाचे नवे पैलू उलगडणारे असणार आहे.
शौर्यगाथा डेमो सत्र -
एक अनोखा अनुभव!
या डेमो लेक्चरमध्ये तुम्हाला शौर्यगाथा अभ्यासक्रमाची झलक मिळेल, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास रोचक पद्धतीने सादर केला जातो. कथा, श्लोक आणि ऐतिहासिक संदर्भ यांच्या माध्यमातून विद्यार्थी केवळ इतिहास शिकणार नाहीत, तर त्यातून प्रेरणा घेऊन त्यांचे मनोबल आणि संस्कार मजबूत होतील. हा संक्षिप्त अनुभव तुम्हाला आमच्या संवादात्मक आणि प्रभावी शिकवणीच्या पद्धतीची नक्कीच ओळख करून देईल.
या सत्रांना कोणी आणि का उपस्थित रहावे ?
या सत्रांना कोण उपस्थित राहू शकतो?
७ ते १५ वर्षे वयोगटातील कोणीही, ज्यांना भारतीय संस्कृती आणि इतिहास यांची आवड आहे आणि त्याची सखोल ओळख करून घ्यायची इच्छा आहे असे सर्वजण या सत्रांमध्ये सहभागी होऊ शकतात. मूल नवखे असो किंवा आधीपासूनच त्याला याची आवड असो, ग्यानकुलच्या माध्यमातून ते हे ज्ञान आनंददायी आणि प्रभावी पद्धतीने आत्मसात करू शकतात!
हा अभ्यासक्रम करणे का आवश्यक आहे?
७ ते १५ वर्षे हा वयाचा असा टप्पा असतो, जिथे आत्मविश्वास, व्यक्तिमत्व आणि आपल्या संस्कृतीची सखोल ओळख निर्माण झाली तर ती मुलांसोबत त्यांच्या आयुष्यभर राहते. ग्यानकुलच्या या अभ्यासक्रमात मुलांना आपल्या समृद्ध इतिहासातील प्रेरणादायी कथा, संस्कृत श्लोक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जीवनमूल्ये शिकवली जातात. हीच जीवनमूल्ये त्यांचं पुढील संपूर्ण आयुष्य घडवण्यात नक्कीच उपयोगी ठरतील.
सी. ए. रूपल सावंत
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचे अभ्यासक, व्याख्याते आणि लेखक.
- डॉ. अजित आपटे यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कौशल्ये यांवर प्रशिक्षण प्राप्त
- छत्रपती शिवाजी महाराजांवरील अनेक पुस्तकांचा सखोल अभ्यास (बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिवछत्रपती, रणजित देसाई यांचे श्रीमान योगी, डॉ. संग्राम इंदोरे यांचे गडकिल्ले आणि मी, इत्यादी)
- १५ हून अधिक वर्षांचा आध्यात्मिक अनुभव
- हजारो विध्यार्थ्यांना अनेक व्याख्यानांमार्फत आणि शिक्षणामार्फत प्रोत्साहित केले (अभिप्राय व्हिडिओज खाली पहा)
ऐका पालकांचे अनुभव
ग्यानकूल ने घडवलेल्या सकारात्मक बदलांची साक्ष!
पालकांचे ग्यानकुलला मिळालेले प्रेम
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
- ✅ संस्कृत श्लोक आत्मविश्वासाने पठण करू शकेल
- ✅ उत्तम संस्कार व आत्मविश्वास विकसित होईल
- ✅ ऐतिहासिक घटनांचे सखोल आकलन होईल
- ✅ भारतीय परंपरांशी आत्मीयता वाढेल
- ✅ छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांबद्दल अभिमानाने बोलू शकेल
- 📱 इंटरनेट असलेले एक उपकरण (मोबाईल/लॅपटॉप/टॅबलेट)
- 🎧 कानात घालण्याचे हेडफोन (शिफारस केली जाते
- 🧠 उत्सुक मन आणि लक्षपूर्वक शिकण्याची तयारी!
आम्ही दर्जेदार शिक्षण देण्यास वचनबद्ध आहोत आणि हा अभ्यासक्रम तुमच्या मुलासाठी एक अर्थपूर्ण अनुभव ठरेल, याची आम्ही खात्री देतो!
नावनोंदणी का करावी?
- तज्ञ मार्गदर्शकांसह थेट संवादात्मक सत्रे
- लाईव्ह क्लासेसनंतर एका महिन्यासाठी रेकॉर्ड केलेले सत्र उपलब्ध
- सीए रूपल सावंत यांच्यासोबत प्रश्नोत्तरे
- ५०००+ विद्यार्थ्यांचा विश्वास
- महाराष्ट्रात महाराजांचा वारसा पुनरुज्जीवित करूया आणि भारतीय संस्कृती जिवंत ठेवूया!
-
ईमेल पत्ता
support@thegyankul.com
संपर्क करा
+91 9372118059
-
Address
ग्यानकूल सेंटर, दुकान नं.2 आणि 3 कृष्णई हाइट्स, कुंभारखान पाडा, सुभाष रोड, डोंबिवली पश्चिम
सामाजिक लिंक
अस्वीकरण:
आम्ही इतिहासाचे संशोधक नाही. आमचे प्रयत्न प्रामुख्याने प्रतिष्ठित इतिहासकार आणि संशोधकांनी केलेल्या संशोधनाचे अध्ययन करून ते सादर करण्यावर केंद्रित आहेत. इतिहास विशाल आणि गुंतागुंतीचा विषय आहे, तसेच प्रत्येक संशोधकाचे दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे आम्ही सादर केलेली माहिती विविध स्रोतांवर आधारित असल्याने त्यात काही तफावत आढळू शकते.
आम्ही मान्य करतो की इतिहास इतका विशाल आहे की त्यातील सर्व गोष्टींचा अभ्यास करणे शक्य नाही. आमचा उद्देश उपलब्ध स्रोतांच्या आधारे ज्ञानाचा प्रसार करणे आणि अधिक सखोल अध्ययनासाठी प्रेरणा देणे हा आहे.
आमच्या वाचकांना आम्ही इतिहासाच्या विविध पैलूंवर व्यापक समज प्राप्त करण्यासाठी विविध स्रोतांचा अभ्यास करण्याचा सल्ला देतो.
ही साइट Facebook वेबसाइट किंवा Facebook, Inc चा भाग नाही. याव्यतिरिक्त, ही साइट कोणत्याही प्रकारे फेसबुकद्वारे समर्थित नाही. FACEBOOK हा FACEBOOK, Inc चा ट्रेडमार्क आहे.






